१ जून पासून २०० नॉन एसी ट्रेन सुरू होणार

0
317

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी अनेक नागरिक अडकले आहे. या सर्वांनासाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ‘ट्विटरवरून दिली आहे. जे लोक गावी जाण्यासाठी थांबले आहेत त्यांची सोय होणार आहे.

येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत, याबाबतचीही माहिती लवकरच दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं. जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कामगारांना मदत करावी. कामगारांचं रजिस्ट्रेशन करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असं आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारांना केलं आहे.

मजुरांना आवाहन करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं की, तुम्ही आहे तिथेच थांबा, तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवलं जाईल. देशाभरात रोज शेकडो विशेष श्रमिक ट्रेन धावत आहेत. आतापर्यंत 1600 ट्रेनच्या माध्यमातून 21.5 लाख मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे, अशी माहिती रेल्वेने दिली.