अबब…राज्यात एकाच दिवसात ७६ बळी

0
317

मुंबई, दि. २० (पीसीबी) : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त झाला असून संकट अधिकाधिक गहिरे होत चालले आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या तीन दिवसात राज्यात 6 हजार 507 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37 हजार 136 वर पोहोचली आहे. ‬आज (19 मे) राज्यात 2 हजार 127 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर या शहरांना मोठा फटका बसतो आहे. ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार नव्हता, पण मुंबई-पुणेचे लोक गावाकडे गेले तशी आता ग्रामिणभागातील संख्या वाढते आहे. दरम्यान, रुग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्यांचीही संख्याही चांगली असल्याचे समाधान आहे.

राज्यात आज (19 मे) 2 हजार 127 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबळींची संख्या 1 हजार 325 पोहोचली आहे. तर दुसरीकडे आज सर्वाधिक 1 हजार 202 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 9 हजार 639 इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात अॅक्टिव्ह 26 हजार 164 झाली आहे.

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण – 2127
आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या – 37136
कोरोना बळी – 76 मृत्यू
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा मृत्यू – 1325
डिस्चार्ज रुग्ण – 1202
एकूण डिस्चार्ज – 9639

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 22746 374 800
पुणे (शहर+ग्रामीण) 4058‬ 938 207
पिंपरी चिंचवड मनपा 182 34 4
ठाणे (शहर+ग्रामीण) 2169 36 7
नवी मुंबई मनपा 1504 80 24
कल्याण डोंबिवली मनपा 557 91 6
उल्हासनगर मनपा 103 0
भिवंडी निजामपूर मनपा 50 11 3
मिरा भाईंदर मनपा 331 143 4
पालघर 67 1 3
वसई विरार मनपा 396 105 11
रायगड 264 5 5
पनवेल मनपा 244 11
नाशिक (शहर +ग्रामीण) 186 2 2
मालेगाव मनपा 654 34
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 60‬ 36 5
धुळे 84‬ 9
जळगाव 303‬ 1 33
नंदूरबार 25 2
सोलापूर 439 41 25
सातारा 142 3 2
कोल्हापूर 81 2 1
सांगली 55 29 1
सिंधुदुर्ग 10 2 0
रत्नागिरी 102 2 3
औरंगाबाद 1028 14 34
जालना 38 0
हिंगोली 107 1 0
परभणी 8 1
लातूर 50‬ 8 2
उस्मानाबाद 11 3 0
बीड 5 0
नांदेड 79 4
अकोला 287‬ 14 17
अमरावती 119‬ 14
यवतमाळ 101 22 0
बुलडाणा 33 8 3
वाशिम 3 0
नागपूर 388‬ 84 6
वर्धा 3 0 1
भंडारा 7 0 0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 5 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 46 0 11
एकूण 37136 9639 1325