घाबरू नका, जगात ३९ लाखावर रुग्ण कोरोनामुक्त

0
338

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) : देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. भारतात सध्या एकूण 1 लाख 1 हजार 139 रुग्ण आहेत. आतापर्यंत 3163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 2350 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 39,174 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. देशात सध्या रिकव्हरी रेट 38.73 टक्के आहे. देशात एकूण 58802 सक्रिय रुग्ण (अॅक्टिव्ह) म्हणजे ज्यांचावर उपचार सुरू आहे. त्याच वेळी केवळ 2.9 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना आयसीयूची आवश्यकता आहे.

भारतात 111 दिवसांत भारतात एक लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांच्या जवळ आहे. तसेच प्रती लाख लोकसंख्येच्या प्रमाणात भारतात मृत्यूसंख्या 0.2 इतकी आहे. तर जगभरातल्या लोकसंख्येचा विचार करता, प्रती लाख लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 4.1 मृत्यू इतके आहे. आतापर्यंत, जगात कोरोनामुळे 3 लाख 11 हजार 847 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रती लाख लोकसंख्येच्या प्रमाणात बेल्जियममध्ये 79.3, स्पेनमध्ये 59.2, यू. के. 52.1, इटली 52.8 आणि अमेरिकेत 26.6 मृत्यूसंख्या आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेचा कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 87,180 जणांचा मृत्यू झाला आहे. यू. के. मध्ये 34,636, इटली 31,908, फ्रान्स 28,059, स्पेन 27,650 आणि ब्राझीलमध्ये 15, 633 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 3163 लोकांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत भारतातल्या 385 सरकारी आणि 158 खासगी प्रयोगशाळांमध्ये 24,25,742 लोकांची चाचणी झाली आहे. गेल्या 24 तासांत 1,08,233 लोकांची चाचणी झाली असून दररोज चाचणीची संख्या वाढत आहे. देशभरात काल विक्रमी 1,08,233 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.