‘१०० कोटी दिले तर श्वानासोबत सेक्स करशील का?’  साजिदवर आहानाचा आरोप

0
3612

मुंबई, दि. २ (पीसीबी) – दिग्दर्शक साजिद खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री आहाना कुम्रा हिने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सलोनी चोप्रा हिने साजिदबद्दल जे सांगितले तोच अनुभव मला देखील आला, असे आहानाने म्हटले आहे.

‘साजिद विकृत आहे हे मी ऐकून होते. एका मिटींगसाठी मी वर्षभरापूर्वी त्याला भेटले. त्यानं मला घरी बोलवले होते. कामासंबधी चर्चा करण्यासाठी त्याने मला बेडरुममध्ये नेले. त्याची आई घरीच होती त्यामुळे बेडरुममध्ये जाण्यापेक्षा आपण बाहेरच बसूयात असे मी त्याला सुचवले. पण, आपल्या कामामुळे तिला त्रास नको असे म्हणत बेडरुममध्ये बसून कामाविषयी चर्चा करू असे तो म्हणला. त्याच्या रुममध्ये खूपच अंधार होता. मी त्याला लाईट लावायला सांगितले त्याने माझे ऐकले.

माझी आई पोलिस अधिकारी आहे हे मी त्याला सांगितले. त्याने मला स्पर्श केला नाही मात्र या भेटीत तो मला विचित्र प्रश्न विचारत राहिला. मी तुला १०० कोटी रुपये दिले तर तू श्वानासोबत सेक्स करशील का असे अनेक विकृत प्रश्न तो मला विचारत होता’ असेही आहाना, एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

साजिद बरोबरच तिने अनिर्बन दास ब्लावरही आरोप केले. अनिर्बनचे महिलांप्रती वर्तन हे चुकीचे असते. माझ्याप्रती अनिर्बनचा उद्देश खूप चुकीचा होता. पण सुदैवानो त्याचा हेतू साध्य झाला नाही, असोही अहाना म्हणली. काही दिवसांपूर्वी लैंगिक गैरवर्तणुकीच्या गंभीर आरोपांमुळे ब्ला यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.