पोलीस भरतीची तयारी करत असताना भरधाव कारने चौघा तरुणांना उडवले; दोघांचा मृत्यू

0
703

पुर्णा, दि. २ (पीसीबी) – पोलीस भरतीसाठी तयारी करत असताना भरधाव कारने चार तरुणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथे घडली.

सोनू साबळे (वय १८) आणि गोविंद साबळे (वय २१) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे रभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात माटेगाव येथील चार तरुण पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावण्याचा सराव करत होते. यादरम्यान, त्यांना  भरधाव तव्हेरा कारने उडवले यात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.