हुंड्याची मागणी करत विवाहितेचा छळ; नऊ जणांवर गुन्हा दाखल

0
205

तळेगाव दाभाडे, दि. ०६ (पीसीबी) – हुंड्याची मागणी करत सासरच्या नऊ जणांनी मिळून विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 3 जानेवारी 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नखातेवस्ती, रहाटणी आणि तळेगाव दाभाडे येथे घडला.

मिराज रईस खान (वय 31), रईस खान (वय 60), सकुनीसा रईस खान (वय 55), सिराज रईस खान (वय 33), आफ्रिन सिराज खान (वय 24), सानिया रईस खान (वय 22), रुक्सार रईस खान (वय 24), बद्रुनिसा खान (वय 28), मेहेर खान (वय 26, सर्व रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी विवाहितेकडे वारंवार हुंड्याची मागणी केली. विवाहितेने त्यासाठी नकार दिला असता तिला शिवीगाळ, मारहाण करून दुसरे लग्न करण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक गोडे तपास करीत आहेत.