ही युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड आहे प्रयत्न केला तरी तुटणार नाही; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना उत्तर

0
493

अमरावती, दि. १५ (पीसीबी) – ही युती म्हणजे फेव्हिकॉलचा जोड होणार, तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ही युती केवळ सत्तेसाठी नाही, ही युती विचारांची आहे. होय आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना – भाजपा युतीचा महामेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. आमचे हिंदुत्व राष्ट्रसाठी, ज्याला देशावर प्रेम आहे, ते आमचे हिंदुत्व आहे असेही ते यावेळी म्हणाले.

सत्तेकरता युती झालेली नाही असे सांगताना भविष्यात युती अशीच टिकणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती झाल्यानंतर काहीजणांनी माघार घेतली असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला. युती हा आपला एकच धर्म, जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र बघायचे नाही असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले.