मतदार जनजागृतीसाठी थेरगावमध्ये रविवारी अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान

0
628

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – कृपासिंधु महिला मंच आणि प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने देशहिताचे भान ठेवून महिलांमध्ये मतदानांविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने खास महिलांसाठी थेरवामध्ये रविवारी (दि. १७) अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

थेरगावमधील मोरया मंगल कार्यालयात दुपारी चार ते सायंकाळी ७ या वेळेत हे व्याख्यान होईल. गेल्या अनेक वर्षांपासून प्रबोधन मंच मतदारांमध्ये जनजागृती करून शंभर टक्के मतदान होण्याकरिता सातत्याने मतदार जागृती मोहीम राबवित आहे. देशाची लोकशाही बळकट होण्याकरिता, देशहितासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे. विशेषतः महिलांमध्ये जनजागृती, आजची स्त्री, जागतिकीकरण, सुजाण स्त्रीत्वाचा आयाम आदी विषयांवर अपर्णा रामतीर्थकर बोलणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपनिरीक्षक कविता रूपनर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी मोफत असून, या व्याख्यानाला महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृपासिंधु महिला मंच व प्रबोधन मंच महिला विभागाच्या सुवर्णा भोईने यांनी केले आहे.