‘हि’ कार आजही पश्चिमी भागांमध्‍ये पसंतीची कार म्‍हणून कायम

0
194

पश्चिम भारतातील ७४ टक्‍के बाजारपेठ हिस्‍स्यासह ईव्‍ही बाजारपेठेत अग्रस्‍थानी

मुंबई, दि . ९ (पीसीबी) : टाटा नेक्‍सॉन ईव्‍ही भारतभरातील तिची उपस्थिती वाढवतच आहे, तसेच भारतातील पश्चिमी प्रांतामध्‍ये लक्षणीय विकास दिसून आला आहे. जानेवारी २०२० मध्‍ये सादर केल्‍यापासून कंपनीने पश्चिम भारतामध्‍ये ३०० टक्‍क्‍यांहून अधिक वाढीची नोंद करण्‍यासोबत ७४ टक्‍के वायटीडी (आर्थिक वर्ष २१) बाजारपेठ हिस्‍सा प्राप्‍त केला आहे. कारला महाराष्‍ट्र, गुजरात, गोवा व मध्‍यप्रदेशमधील १० शहरांमध्‍ये अधिकतम पसंती मिळत आहे. या सुसंगत इलेक्ट्रिक एसयूव्‍हीची डिझाइन, सुलभता, कार्यक्षमता, तंत्रज्ञान आणि कमी कार्यसंचालन खर्चांसाठी प्रशंसा करण्‍यात येत आहे. या विकासामुळे ईव्‍हींबाबत जागरूकतेला चालना मिळाली आहे, चार्जिंग पायाभूत सुविधांमध्‍ये वाढ होत आहे, सरकारी हस्‍तक्षेपांना प्रोत्‍साहन मिळत आहे, वेईकल देणा-या अविरत लाभांसोबत ईव्‍हींसंदर्भात असलेल्‍या गैरसमजूती दूर होत आहेत.

टाटा नेक्‍सॉन ईव्‍हीसाठी सातत्‍यपूर्ण वाढ व प्रशंसेबाबत बोलताना टाटा मोटर्सच्‍या विक्री, विपणन व कस्‍टमर केअर, इलेक्ट्रिक वेईकल बिझनेस युनिटचे प्रमुख श्री. रमेश दोरायराजन म्‍हणाले,”नेक्‍सॉन ईव्‍ही इलेक्ट्रिक वेईकल विभागामध्‍ये आमच्‍यासाठी गेम-चेजिंग उत्‍पादन राहिली आहे. गेल्‍या वर्षी सादर केल्‍यापासून या वेईकलची ग्राहक व उद्योगक्षेत्राकडून भरपूर प्रशंसा करण्‍यात येत आहे. रोमांचपूर्ण कामगिरी, कनेक्‍टेड ड्राइव्‍ह अनुभवासह शून्‍य उत्‍सर्जन आणि किफायतशीर किंमतीसह नेक्‍सॉन ईव्‍हीला भारतातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक वेईकल म्‍हणून स्‍थान मिळाले आहे. प्रांतांमध्‍ये सातत्‍यपूर्ण विकास धोरणासह ईव्‍ही देशातील विविध राज्‍य सरकार संस्‍थांसाठी देखील पसंतीची कार बनली आहे. आम्‍ही आशा करतो की, आम्‍ही आगामी वर्षांमध्‍ये इलेक्ट्रिक भविष्‍यासाठी अपरिहार्य गरजेसंदर्भात ग्राहकांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍याचा चालना देत भारतात इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या अवलंबतेप्रती योगदान देण्‍यासाठी या विकासाचा लाभ घेऊ शकतो.”

टाटा मोटर्सची क्षेत्राला व्‍यापून घेणारी २४ विक्री आऊटलेट्स व २९ टाटा ऑथोराइज्‍ड सर्विस सेटअप्‍ससह पश्चिम भारतामध्‍ये प्रबळ नेटवर्क उपस्थिती आहे. प्रत्‍येक वाहनासोबत येणा-या मोफत होम-चार्जिंग सोल्‍यूशन्‍ससह ग्राहकांना शहरांमध्‍ये असलेल्‍या ४६ फास्‍ट-चार्जिंग स्‍टेशन्‍सची सुविधा मिळेल. यापैकी काही स्‍टेशन्‍स मुंबई-पुणे, पुणे-नाशिक, पुणे-औरंगाबाद, पुणे-कोल्‍हापूर, सुरत-अहमदाबाद आणि अहमदाबाद-राजकोट अशा प्रमुख पश्चिमी महामार्गांवर आहेत.

एकाच चार्जमध्‍ये शून्‍य उत्‍सर्जनासह लांबच्‍या अंतरापर्यंत उत्तम सुविधा देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या नेक्‍सॉन ईव्‍हीने पर्यावरणासंदर्भात जागरूक असलेल्‍या, तंत्रज्ञानप्रेमी व कमी मेन्‍टेनन्‍स देणारी कारचा शोध घेणा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्राहक पसंतीसंदर्भातील हा बदल महिन्‍यांपासून असलेल्‍या लॉकडाऊनमुळे देखील असू शकतो. या लॉकडाऊनदरम्‍यान उत्‍सर्जन-मुक्‍त पर्यावरण व शांतमय जीवनाचा आनंद असण्‍यास जीवनाचा दर्जा सुधारण्‍याबाबत जागरूकता वाढली आहे.

तसेच, भारतामध्‍ये ईव्‍हींच्‍या अवलंबतेला चालना देण्‍यासाठी टाटा मोटर्सने सर्वांगीण ई-मोबिलिटी इकोयंत्रणा ”टाटा युनिईव्‍हीअर्स’ देखील सादर केली. या यंत्रणेमुळे व्‍यवहार्य ईव्‍ही वातावरण निर्मितीसाठी इतर टाटा ग्रुप कंपनीजच्‍या क्षमता व अनुभवांचा लाभ घेता येईल. टाटा युनिईव्‍हीअर्सच्‍या पाठबळाच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना ई-मोबिलिटी ऑफरिंग्‍ज उपलब्‍ध होतील, ज्‍यामध्‍ये चार्जिंग सोल्‍यूशन्‍स, नाविन्‍यपूर्ण रिटेल अनुभव आणि सुलभ आर्थिक पर्यायांचा समावेश आहे.