हिंमत असेल, तर माढ्यातून लढा; अजित पवारांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान   

0
478

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच. तुम्हाला नाही चारीमुंड्या चितपट केले, तर नाव सांगणार नाही, असे थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.   

भोसरीत झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहीर सभेत पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील काहीही बरळू लागले आहेत. म्हणे यावेळी पवार साहेबांचा पराभव होणार आहे. हा बाबा स्वप्नात आहे की बावचळून गेला आहे. कोणाला माहिती. ना कधी खासदारकी लढले ना आमदारकी अन् तरी आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला द्यायला निघाले आहेत. त्यांनी आपली पाटीलकी सांभाळावी. ती व्यवस्थित कशी राहिल, हे पाहावे. उगाच काहीही गरळ ओकू नये.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र जर त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामारे जावे लागेल. त्यामुळे त्यांनी वयाचा आणि तब्येतीचा विचार करुन निवडणूक लढवू नये. माढा आणि बारामती या जागी युतीचेच उमेदवार जिंकतील, असे चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील एका सभेत   म्हटले होते.