चिखलीतून ६७ हजारांच्या गुटख्यासह दोघांना अटक

0
489

चिखली, दि. ६ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे घरात साठवून ठेवलेला ६७ हजार ६५० रुपयांचा गुटख्यासह दोन तरुणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ५) पहाटे दीडच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली.

बाबुलाल गणाराम चौधरी, मुकेश गणाराम चौधरी (वय २४, दोघे रा. साईकुंज सोसायटी, जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस एस इंगळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबुलाल आणि मुकेश यांनी त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करत त्यांच्या घरातून केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा ३० पुडे आणि केसरयुक्त विमल पान मसाला १० बॅग्स असा एकूण ६७ हजार ६५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. आरोपींवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक घुगे तपास करत आहेत.