हिंजवडी पोलिसांनी विनयभंग झालेल्या तरुणीला चार तास ठेवले ताटकळत; पोलीस आयुक्तांना पाठवली नोटीस

0
676

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत एका २५ वर्षीय संगणक अभियंता तरूणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकाने पीडित तरुणीला चार तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. यामुळे संतापलेली तरुणी तक्रार न देता निघून गेली. तरूणीने तिच्या वकिलामार्फत थेट पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना नोटीस पाठवली ज्यानंतर आयुक्त पद्मनाभन यांनी स्वत: तरुणीची भेट घेऊन त्या पोलिस अधिकाऱ्याचे खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.