हिंजवडीत होळीच्या रात्री टोळक्यांनी हॉटेलची तोडफोड करुन कर्मचाऱ्यांवर केले कोयत्याने वार

0
790

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – दहा ते पंधरा जणांचे टोळके हातात कोयते आणि चॉपर घेऊन हॉटेलात घुसले. त्यानंतर हॉटेलची तोडफोड करत त्यामधील कामगारांना बाहेर काढून त्याच्यावर कोयते आणि चॉपरने वार केले. ही थरारक घटना बुधवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथील हॉटेल पंजाब रसोई येथे घडली.

प्राप्त माहितीनुसार, हिंजवडी फेज दोन येथे पंजाब रसोई नावाचे हॉटेल आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास या हॉटेलमध्ये दहा ते पंधरा जणांचे टोळके हातात कोयते आणि चॉपर सारखे घातल हत्यारे घेऊन घुसले. त्यानंतर हॉटेलची तोडफोड करुन त्यातील कामगारांना बाहेर काढून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी जखमिंना हिंजवडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान या घटनेमुळे हिंजवडी परिसरात भितीचे वातावरण आहे.