हिंजवडीत मित्रांनीच मित्राला केली रिंग पान्याने मारहाण

0
484

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – मित्रामित्रांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीतुन दोन मित्रांनी एका मित्राच्या डोक्या लोखंडी रिंग पाना मारुन जखमी केले. ही घटना सोमवार (दि.२७) सायंकाळी सातच्या सुमारास चांदणी चौक बावधन येथे घडली.

संजय कृष्णा कोंडेकर (वय २९, रा. माताळवाडी फाटा, भुगाव) असे जखमी तरुणाचा नाव आहे. याप्रकरणी बुक्या माझिरे (वय ३०, रा. भुकुम ता मुळशी जि पुणे) आणि दादा खाटपे (वय ३५, रा. शास्त्रीनगर कोथरुड) या दोघांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी संजय आणि दोघे आरोपी हे मित्र आहेत. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हे तिघे चांदणी चौक बावधन येथून बोलत चाललले होते. यादरम्यान त्यांच्यात शाब्दिक चकमक झाला. यातून बुक्या आणि दादा या दोघांनी संजय याच्या डोक्यात लोखंडी रिंग पाना मारुन जखमी केले. बुक्या आणि दादा या दोघांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.