चाकणमध्ये कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल हिसकावला

0
365

चाकण, दि. २९ (पीसीबी) – पायी चाललेल्या एका तरुणाजवळील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल दोन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून हिसका मारुन चोरुन नेला. ही घटना चाकण नाणेकरवाडी युसीजी कंपनीसमोर घडली.

याप्रकरणी प्रविण सुरेश अंबुलकर (वय २९, रा. मेदनकरवाडी ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (दि.१९) रात्री पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी प्रविण हे नाणेकरवाडी युसीजी कंपनीजवळून पायी चालले होते. यावेळी  दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी प्रविणला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याजवळील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. चाकण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.