हिंजवडीतील श्रावणी नियोगीची ‘ग्लॅमॉन मिस इंडिया २०१८’ स्पर्धेच्या अंमित फेरीत धडक

0
868

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत श्रावणी नियोगी हिने आपल्यातले ‘बेस्ट टॅलेंट’ दाखवत ‘ग्लॅमॉन मिस इंडिया २०१८’ स्पर्धेच्या अंमित फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे, सर्वत्र परिसरातून तिचे कौतूक होत आहे.

हिंजवडी आयटी कंपनीत अभियंता येथील श्रावणी नियोगी हिने ‘ग्लॅमॉन मिस इंडिया २०१८’ स्पर्धेच्या अंमित फेरीत धडक मारून ‘मिस बेस्ट टॅलेंट’ हा किताब पटकावला. दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील २५ राज्यातील एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीत ३५ स्पर्धकांचा समावेश होत. या ३५ स्पर्धकांतून श्रावणीने आपल्यातले बेस्ट टॅलेंट दाखवत ‘ग्लॅमॉन मिस इंडिया २०१८’ स्पर्धेच्या अंमित फेरीत प्रवेश केला आहे.