भाजप महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण खून प्रकरणी लातूरमधून एकजण ताब्यात

0
575

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – नालासोपारा येथील भाजपच्या महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण (वय ३२) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी लातूर येथून एका संशयित आरोपीला गुरुवारी (दि.११) रात्री ताब्यात घेतले.

नितीन चाफे (रा. लातूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२ ऑक्टोबर) रुपाली चव्हाण यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. रुपाली यांना इस्त्रीचे चटके आणि इलेक्ट्रीक शॉक दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी नितीन चाफे हा रुपाली यांच्या फ्लॅटवर पेईन्ग गेस्ट म्हणून राहात होता, अशी माहिती रुपाली यांच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नितीनचा शोध घेऊन गुरुवारी रात्री लातूर येथून ताब्यात घेतले. रूपाली चव्हाण या भाजप युतीच्या वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.