हा लॉकडाऊन यशस्वी झाला,तर पुन्हा लॉकडाऊन वाढणार नाही – उपमुख्यमंत्री

0
307

 

पुणे, दि.१२ (पीसीबी) – लोकहितासाठी घेतलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनला राज्यातील जनतेने सहकार्य करावे. प्रत्येकाने घरातंच थांबावं, डॉक्टर, पोलीस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे. हा लॉकडाऊन यशस्वी झाला,तर पुन्हा लॉकडाऊन वाढवावा लागणार नसल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. हे लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली, तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे, असेही पवारांनी सांगितले.