स्वयंपाकघरातील तमालपत्राचे ‘हे’ गुणकारी फायदे माहिती आहेत..?

0
341

स्वयंपाकघरामध्ये असलेल्या मसाल्यांमध्ये एक महत्वाचा पदार्थ म्हणजे ‘तमालपत्र’. कारण कि, जर कोणताही मसाला करायचा असेल तर तमालपत्र महत्वाची भूमिका बजावते. अगदी चटणीपासून शाही बिर्याणी मध्ये तमालपत्र आवर्जून वापरलं जात. पदार्थांची चव वाढवणारा हा पदार्थ शरीरासाठीदेखील तितकाच गुणकारी आणि फायदेशीर आहे. मात्र याचे फायदे फार कमी जणांना माहित असतात. त्यामुळेच आपल्याला तमालपत्राचे नेमके फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊयात…

१. तमालपत्र जेवणातील पदार्थांची चव वाढवते. एक वेगळीच चव तमालपत्राच्या फोडणीने पदार्थाला लाभते.

२. कफ, अॅसिडिटी, पित्ताच्या त्रासावरती तमालपत्र हे उत्तम गुणकारी ठरत.

३. आपल्याला शुगरचा त्रास असेल तर तमालपत्रामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहींसाठी       तमालपत्र हे फायदेशीर आहे.

४. जर आपल्याला रात्रीची शांत झोप लागत नसेल तर तमालपत्र त्यावर उत्तम औषधी ठरते.

५. तमालपत्राच्या सेवनाने किडनी स्टोनचा त्रास कमी होतो.

६. किडनीशी निगडीत समस्या असल्यास त्या तमालपत्र सेवनाने दूर होतात.

७. तमालपत्राच्या तेलाने मालिश केल्याने डोकेदुखी आणि मानदुखीला अराम मिळतो.

८. आपल्याला अपचनाचा त्रास असल्यास तमालपत्राचं सेवन केल्यामुळे अपचन दूर होतं.

(टीप: वरील उपाय करून पाहताना एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण प्रत्येकाची       अंतर्गत शरीररचना वेगवेगळी असते. त्यानुसार तमालपत्राचे सेवन करावे.)