सेवानिवृत्तीनंतर अधिकारी, कर्मचा-यांनी छंद जोपासावे – महापौर

0
641

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – सेवानिवृत्त  होणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी पुढील जीवनात जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबीयांना द्यावा व आपले छंद जोपासावे,  असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिका सेवेतून  ऑगस्ट २०१९ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १९ अधिकारी व    कर्मचा-यांचा सत्कार महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते.

कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, रेखा गाडेकर, नितीन समगीर उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये मुख्य लिपिक रोहिणी गव्हाणकर, तुकाराम गायकवाड, आरोग्य सहाय्यक आनंदा फंड, उपशिक्षिक रुक्साना आत्तार, मुख्य वाहनचालक हरिभाऊ सुरकुले, वाहनचालक शांताराम दौंडकर, यशवंत डोळस, स्टाफ नर्स प्रीती देवळे, प्रयोगशाळा सहाय्यक संजीव धोकटे, शिपाई भारत शिणगारे, रखवालदार दत्तात्रय गव्हाणे, किसन बिरलींगे, मजूर रमेश गंगावणे, गटरकुली अजिनाथ रोकडे, सफाई कामगार शकुंतला कुचेकर तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये सदाशिव पाटील, कार्यालयीन अधिक्षक राजेश माडे, क्रीडा शिक्षक गेनू  जाधव, सफाई कामगार विजया रसाळ आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केली.