भाजप आणि बजरंग दल ISI कडून पैसे घेतात – काँग्रेस ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंह

0
404

दिल्ली, दि. १ (पीसीबी) –  भाजप आणि बजरंग दल ISI कडून पैसे घेतात, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजय सिंह यांनी केला आहे. एएनआयने या संदर्भातला त्यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे.

पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी मुस्लीमांपेक्षा जास्त गैरमुस्लीमच करत आहेत, असही त्या व्हीडिओमध्ये दिग्वीजय सिंह यांनी म्हटले आहे.

सरकारला RBI कडून पैसे घ्यावे लागत आहेत. मात्र पंतप्रधान मोदींना याची काळजी नाही तर फिट इंडियाची चिंता आहे, अशा शब्दात त्यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, दिग्वीजय सिंह यांनी भाजप आणि बजरंग दलावर केलेल्या आरोपाने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.