सेंट्रल जेलमध्ये गोळीबार; कैद्यांनी तुरुंग अधीक्षकांची जाळली कार                         

0
410

पंजाब, दि. २७ (पीसीबी) – लुधियाना येथील सेन्ट्रल जेलमध्ये मोठा गोंधळ झाला असून कैद्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. कैद्यांनी एकमेकांवर दगडफेक केली त्यानंतर गोळीबारही केला. यामध्ये काही कैदी जखमी झाले आहेत. तसेच एक पोलीस अधिकारीही जखमी झाला असून तुरुंग अधीक्षकाची गाडीही कैद्यांनी जाळली आहे.

या गोंधळाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

पोलिसांनी हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कैद्यांनी हल्लाबोल केला. दरम्यान, कैद्यांच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर गोळीबारही केला. त्यामुळे सध्या या तरुंगात तणावाचे वातावरण आहे. कैद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच अतिरिक्त पोलिसांची कुमकही मागवण्यात आली असून जाळपोळीनंतर आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या गाड्याही जेलमध्ये दाखल झाल्या आहेत.