सुरक्षा भेदून, शेतकऱ्याच्या मुलीचा उद्धव ठाकरेंकडे हट्ट, माझ्या उंबऱ्याला पाय लावा…

0
632

सातारा,दि.१६(पीसीबी) –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सातारा-सांगली जिल्ह्यातील ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक गावांना-शेतकऱ्यांना भेट दिली. यावेळी एका शेतकऱ्याच्या मुलीने सुरक्षा रक्षकांना बाजुला करत उद्धव ठाकरेंनी दोन मिनीट का होईना घरी आपल्या घरी यावं, असा हट्ट धरला ;अखेर उद्धव ठाकरे यांना तिचा हट्ट पुरवावा लागला आणि ते थेट तिच्या घराकडे निघाले.                                                              
उद्धव ठाकरे चालत त्या मुलीच्या घरी पोहेचले. हे घर भानुदास कोरडे नावाच्या शेतकऱ्याचं होतं. भानुदास कोरडे हे शिवसैनिक आणि त्यांची मुलेही शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी. आपल्या घरात चक्क शिवसेनाप्रमुखांचा मुलगा उद्धव ठाकरे हे आल्याचं पाहून या कुटुंबातील अबालवृद्धांचे चेहरे उजळून निघाले. उद्धव ठाकरे यांनीही सर्व कुटुंबाला स्वतःसोबत उभं करून फोटो काढला. उद्धव ठाकरेंच्या विनम्रतेने हे कुटुंब भारावून गेलं, त्यांना अश्रू अनावर झाले. जेव्हा या कुटुंबातील सदस्य उद्धव ठाकरेंच्या पाया पडायला आले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवलं आणि मी एक सामान्य माणूस आहे कुणी देव नाही, असं ते म्हणाले.