सिने अभिनेते इर्फान खान काळाच्या पडद्याआड

0
245

प्रतिनिधी,दि.२९ (पीसीबी) – प्रसिद्ध सिने अभिनेता इर्फान खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इर्फान खानची तब्येत अचानकपणे खालावल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयातील आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने इर्फान खानला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती केले गेले होते, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मार्च २०१८ इर्फान खानला इंडोक्राइन ट्युमर हा अत्यंत दुर्धर आजार झाला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सुमारे वर्षभर इर्फान खान उपचारासाठी लंडन येथे होते. लंडनवरुन परतल्यावर अंग्रेजी मीडीयम या चित्रपटाचे राजस्थान येथे झालेल्या शुटींगमध्ये इर्फान सहभागी झाले व त्यानंतर मुंबईत परतले होते. काही दिवसांपूर्वीच इर्फानच्या आईचे जयपुर येथे निधन झाले. परंतु लाॅकडाऊनमुळे मुंबईतच अडकल्याने इर्फानला त्यांच्या आईच्या अंत्यविधीत भाग घेतां आला नाही.

मकबुल, पानसींग तोमर, लंच बाॅक्स, पीकु, हिंदी मिडीयम, लाईफ इन अ मेट्रो अशा अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार इर्फानला मिळाले. भारतीय चित्रपट सृष्टीत भरीव कामगिरी केल्याने भारत सरकारने इर्फान खानला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.