हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला – उद्धव ठाकरे

0
497

मुंबई,दि.२९(पीसीबी) – प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले” असं उद्धव ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

इर्फान खानची तब्येत अचानकपणे खालावल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयातील आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने इर्फान खानला उपचारासाठी रुग्णालयात भर्ती केले गेले होते, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मकबुल, पानसींग तोमर, लंच बाॅक्स, पीकु, हिंदी मिडीयम, लाईफ इन अ मेट्रो अशा अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार इर्फानला मिळाले. भारतीय चित्रपट सृष्टीत भरीव कामगिरी केल्याने भारत सरकारने इर्फान खानला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.