सावधान… कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरियंट, महाराष्ट्र शासनाची नवी नियमावली

0
419

नवी दिल्ली, दि. २७(पीसीबी) – दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं खबरदारी घेण्यास सुरुवात केलीय. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांचा पालन करावं लागेल, तर इतर राज्यातून येणारा प्रवासी दोन्ही लशी घेतलेला असावा किंवा 72 तासांपूर्वी RT-PCR चाचणी केलेला असावा, असं महाराष्ट्र सरकारनं नव्या नियमावलीत म्हटलंय. राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठीही लशीच्या दोन्ही डोसची अट ठेवण्यात आलीय. कार्यक्रम, सभागृह, मॉल्स यांमध्ये प्रवेशासही हा नियम लागू करण्यात आलाय.

मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. अन्यथा 500 रुपयांचा दंड आकरला जाईल. राजकीय सभाग, कार्यक्रमांमध्ये कोव्हिडच्या नियमांचा उल्लंघन केल्यास 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असंही आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय. केंद्र सरकारनंही सर्व राज्यांना पत्र लिहून, दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची नीट तपासणी करण्यास केंद्रानं राज्यांना कळवलंय.

दक्षिण अफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशाला क्वारंटाईन करणार
दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला क्वारंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटसंदर्भात खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेसह जर्मनी, ऑस्टिृया, बेल्जियम, रशिया यांयारख्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येईल, असंही पेडणेकर यांनी सांगितलं. वरील सर्व देशांमधून येणारा प्रवासी पॅाझिटिव्ह आढळल्यास जिनोम सिक्वेसिंग करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, नव्या कोरोना व्हेरियंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना तसंच नियोजन यांसाठी मुंबई महापालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे..
जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाचा नवा विषाणू हा चिंताजनक असल्याचं जाहीर केलं असून त्याला ओमायक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे. भारतातील विविध राज्यांनी आता प्रतिबंधात्मक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांकडून खबरदारीची सूचना
कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत खबरदारी बाळगावी अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून माहिती दिली. सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत माहिती दिली. नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा गुणधर्म, विविध देशांमध्ये त्याचा पाहायला मिळालेला परिणाम, भारतावर होऊ शकणारा संभाव्य परिणाम या सर्व गोष्टींची पंतप्रधान मोदींना माहिती देण्यात आली. या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. आंतरराष्ट्रीय अड्डाणांमार्फत देशात दाखल होणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवावी, असं मोदी म्हणाले.
धोक्याची सूचना असलेल्या देशांवर लक्ष केंद्रीत करावं, या देशांमध्यून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी घेण्यात यावी. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान अडचणी येऊ नयेत, याचीही काळजी घ्यावी, असं मोदी म्हणाले. तसंच या संदर्भात कार्यरत अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांसोबत मिळून एकत्रितपणे काम करावे. जिल्हे तसंच राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटबाबत योग्य ती माहिती आणि जागरुकता निर्माण होईल, याची सर्वांनी खात्री करावी, अशी सूचना मोदी यांनी केली.

राज्यांकडून उपाययोजना
नव्या कोरोना व्हेरियंटची कुणकुण लागताच देशातील विविध राज्य सरकारं तातडीने सावध झाल्याचं पाहायला मिळत आहे. बाधित देशांमधून बंगळुरूत दाखल होणाऱ्या प्रवाशांनी RT-PCR चाचणी करून घ्यावी, असं कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. डी. के. सुधाकर यांनी म्हटलं.