सातारा जिल्ह्यात भूकंपाचे तीव्र धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
334

सातारा, दि. २० (पीसीबी) – सातारा परिसरासह जिल्ह्यात आज ( गुरूवारी) सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के बसले, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.  यामुळे परिसरातील  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

भूकंपाचा पहिला  धक्का रिश्टर स्केलवर ४.८ इतक्या तीव्रतेचा तर दुसरा धक्का ३.० इतक्या तीव्रतेचा नोंदवला गेला.   पहिला भूकंप १० किलोमीटर तर दुसरा भूकंप ५ किलोमीटर खोलवर  भूगर्भात झाला.

या धक्क्यांमुळे कुठेही हानी झाली नसल्याचे वृत्त आले आहे. मात्र, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भूकंपाचे धक्के संपूर्ण सातारा जिल्ह्यासह  कोयना, कराड आणि पाटण परिसरात  बसले.