सांगवीत सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन भावालाच केली मारहाण

0
450

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – रिक्षा आडवी लावून मावस भावाने रिक्षाचालक भावाच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन जखमी केले. ही घटना सोमवार (दि.१७) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौकात घडली.

शिवराम सतिश जाधव (वय २३, रा. गोडाउन चौक, आळंदी रोड) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याचा मावस भाऊ नागनाथ दगडु जाधव (वय २३, रा. फिनोलेक्स कॉलणी, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराम आणि आरोपी नागनाथ हे दोघे मावस भाऊ असून रिक्षाचालक आहेत. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास शिवराम हा त्याच्या ताब्यातील रिक्षा घेऊन पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौकातून चालला होता. यावेळी नागनाथ हा त्याच्या ताब्यातील रिक्षा घेऊन तेथे आला. त्याने त्याची रिक्षा शिवराम याच्या रिक्षाच्या आडवी लावली. आणि तेथे पडलेला सिमेंटचा ब्लॉक शिवरामच्या डोक्यात आणि पायावर मारुन जखमी केले. नागनाथ सध्या फरार आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.