सांगली जिल्ह्यातील ‘हा’ काँग्रेस नेता भाजपमध्ये प्रवेश करणार ?

0
427

सांगली, दि. २२ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गळतीला सुरूवात झाली आहे.  सांगली जिल्ह्यातील  काँग्रेस नेते आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख भाजपमध्ये  प्रवेश करणार असल्याचे समजते. याबाबतच्या  चर्चांना सुरूवात झाली आहे.

सत्यजित देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत  शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी सत्यजित देशमुख यांची बोलणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून त्यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान,  सत्यजित देशमुख यांना भाजपने उमेदवारी दिल्यास शिराळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.