पत्नीच्या प्रियकराचा खून करण्यासाठी कारागृहातून पलायन केलेल्या आरोपीला देहुरोड पोलिसांनी केले अटक

0
701

देहुरोड, दि. २२ (पीसीबी) – खून केलेल्या पत्नीच्या प्रियकराला ठार मारण्यासाठी विसापूर कारागृहातून पलायन केलेल्या आरोपीला देहुरोड पोलिसांनी अटक केले आहे.  ही कारवाई रविवारी (दि.२१) सकाळी सातच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे करण्यात आली.

अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय २३, रुपीनगर, तळवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०११ मध्ये आरोपी अशोकने आपल्या पत्नीचा अनैतिक संबंधातून खून केला होता. त्यानंतर त्याला पत्नीच्या खुना प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हा पासून आरोपी अशोक हा कारागृहात पत्नीच्या प्रियकराचा खून करण्याची योजना आखत होता. अशोक सध्या विसापूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रविवारी सकाळी मोकळ्या मैदानात शौचास बसतो, असे सांगून त्याने कारागृहाच्या मैदानातून पलायन केले आणि पत्नीच्या प्रियकराला ठार करायचे ठरवले.

त्याचे घर हे रुपीनगर परिसरात असल्याने तो येथे येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना विसापूर कागगृहातून देण्यात आली होती. त्यानुसार त्याच्या घराजवळ सापळा लावून आरोपी अशोकला अटक करण्यात आली. मृत पत्नीचा प्रियकर हा परभणी येथे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी कुटुंबाला भेण्यासाठी शहरात आला होता. त्यानंतर तो मराठवाड्यात जाऊन पत्नीच्या प्रियकराला जीवे ठार मारणार होता. परंतु, त्याचा हा कट देहूरोड पोलिसांनी हाणून पाडला.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शना खाली देहूरोड पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, गायकवाड, पोलीस कर्मचारी सावंत, सात्रस, उगले, जाधव, परदेशी, तेलंग, शेजाळ, घारे यांच्या पथकाने केली.