समाजमाध्यमांवर पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून शिवीगाळ; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

0
400

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – राज्याचे ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून सकारवर टीका करणाऱ्यांना समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देण्यात येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सचिन सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  गेल्या दोन दिवसांपासून सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात समाजमाध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात आहे. तसेच फोनवरून व समाजमाध्यमांवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये राज्याच्या  मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचा दंभ या धमक्या देणाऱ्यांकडून दाखवला जात आहे.

प्रश्न हा आहे की विरोधकांनी केलेली टीका सरकारला आवडत नाही का?’ असा सवाल सचिन सावंत यांनी या पत्रात केला आहे.  दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळे हिने देखील सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि धमक्या येत असल्याची तक्रार केली आहे.