सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

0
455

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा. त्याचबरोबर सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाने दिला.