विवेक अग्निहोत्रीने संपूर्ण कपडे काढून डान्स करण्यास सांगितले, मात्र सुनील शेट्टी आणि इरफान माझ्याबाजूने उभे राहिले- तनुश्री

0
3394

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तणूकीचे आरोप केल्यानंतर आता तनुश्री दत्ता हिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवरदेखील सेटवर गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. २००५ मध्ये ‘चॉकलेट : डिप डार्क सिक्रेट’ चित्रिकरणावेळी त्यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचे तिने म्हटले आहे. मात्र यावेळी सुनील शेट्टी आणि इरफान खान आपल्या पाठीशी उभे राहिले असे म्हणत तिने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.

‘चॉकलेट…’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कोणतीही कल्पना न देता मला संपूर्ण कपडे काढून डान्स करण्यास दिग्दर्शकाने (विवेक अग्निहोत्रीने )सांगितले. या दृश्यात मी नव्हते तरीही मी अशाप्रकारचा टेक द्यावा अशी सूचना त्यांनी मला केली पण सुदैवाने सुनील शेट्टी आणि इरफान खान त्यावेळी माझ्याबाजूने उभे राहिले’ असे ती एका या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.