सफरचंद सालीसकट खात नसाल तर करताय ‘हि’ चूक; जाणून घ्या सफरचंद सालीसकट खाण्याचे ‘हे’ फायदे

0
463

ऋतूनुसार फळे खाणे हे आरोग्यासाठी चांगले आणि पोषक असते, असे आपण नेहमी ऐकतो. ऋतूनुसार त्या ऋतूतील फळे आवर्जून आपण खायला हवीत. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कारण फळांमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, अस डॉक्टरही अनेकदा सांगतात. मात्र, आपण पाहिलं तर लहान मुले किंवा अगदी मोठी माणसेही फळे खाण्याचा कंटाळा करताना दिसतात. आता सफरचंद हे फळ आरोग्याला अतिशय फायदेशीर असे फळ आहे, असे म्हटले जाते. ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना आवर्जून सफरचंद खाण्यास सांगितले जाते. पण अनेकांना सफरचंद साल काढून खायची सवय कित्येक जणांना असते. मात्र, हे काही जणांनाच माहित आहे कि, सफरचंदाची साल आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.

  • सफरचंद सालीसकट का खावे

१. सफरचंद हे मोतीबिंदूपासून बचाव होण्यासाठी सालीसकट खाण्याने मदत होते. तसेच नियमितपणे सफरचंद खाल्ल्यास मोतीबिंदू होत नाही.

२. दातांना किडण्यापासून सफरचंद बचाव करते. तसच गर्भवती महिलांमध्ये रक्तवाढीसाठी सफरचंद उपयुक्त ठरते.

३. सफरचंदाच्या सालीमुळे मेंदूतील पेशी लवकर खराब होत नाहीत. तसेच यामुळे बुद्धी चलाख होण्यास मदत होते. त्यामुळे सालीसकट खाल्लेले सफरचंद फायद्याचे असते.

४. सफरचांदाची साल रक्तातील सारखेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह असेल त्यांनी सफरचंद सालासकट खाणे गरजेचे आहे.

५.सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी ते अतिशय उपयुक्त असते. यामुळे शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठीही मदत होते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठीही सफरचंद खाणे फायदेशीर असते.

याच सगळ्या सफरचंदाच्या गुणांमुळे सफरचंद हे साली सकट खाण फायद्याचं आणि आरोग्यदायी आहे.