“आजचा दिवस इतिहासात ‘काळा दिवस’ म्हणून गणला जाईल”

0
436

देश,दि.२०(पीसीबी) – राज्यसभेत आज विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर करण्यात आली. यानंतर आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल असं काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांनी सांगितले.

“त्यांनी (राज्यसभा उपसभापती हरिवंश) लोकशाहीच्या परंपरेचे रक्षण करायला हवे. मात्र या ऐवजी त्यांच्या वागणुकीमुळे आज लोकशाही परंपरा आणि प्रक्रियेस नुकसान पोहचवले आहे. यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे.” असं अहमद पटेल म्हणाले.

दरम्यान “हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून गणला जाईल. ज्या प्रकारे ही विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. ते लोकाशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. १२ विरोधी पक्षांनी राज्यसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहे.” असे देखील पटेल यांनी माध्यमांसमोर सांगितले.