सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील विद्यार्थांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच महिलांसाठी प्रथमोपचार उपक्रमाचे यशस्वी आयोजन !

0
157

पुणे, दि. 15 (पीसीबी) – सनातन संस्थेच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून थोरवे विद्यालय सातारारस्ता पुणे येथील इ. ८ वी च्या विद्यार्थांसाठी 11 मार्च या दिवशी आरोग्य विषयक मार्गदर्शन हा उपक्रम घेण्यात आला. डाॅ. श्री. प्रणव अर्वतकर यांनी हिंदु कालगणने नुसार एकूण ऋतु किती ? ऋतुमानानुसार आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? काय खावे व काय खाण्याचे टाळावे याची सविस्तर माहिती दिली.

शाळेतील 50 विद्यार्थांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. हा उपक्रम राबवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच अंबेगाव सातारारस्ता पुणे येथील विघ्नहर्ता सोसायटी मधील महिलांसाठी प्रथमोपचार हा उपक्रम घेण्यात आला. सौ. सिमा कुटे यांनी हा उपक्रम घेतला.

 

एखादा अपघात झाल्यानंतर डाॅक्टरांचे साहाय्य मिळेपर्यंत आपण रूग्णाची कशी काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या उपक्रमाचा लाभ सोसायटीतील 20 महिलांनी घेतला. यावेळी हाताला जखम झाल्यानंतर त्रिकोणी पट्टीच्या सहाय्याने झोळी कशी बांधायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.