सत्तेत कोणीही चिरकाल नाही; गिरीश बापटांचे पुन्हा सत्ताबदलाबाबत विधान

0
705

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – उद्या सत्तेत कोणी ना कोणी येईल. इथे कुणीही चिरकाल राहिलेले नाही, याआधीही पुन्हा सत्ता येईल न येईल आत्ताच कामे करुन घ्या, असे वक्तव्य बापट यांनी एका जाहिर सभेत केले. ते मुंबईत एफडीएच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात आता सत्याच्या प्रयोगाऐवजी सत्तेचे प्रयोग सुरु आहेत, असे वक्तव्य भाजप नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी केले.

गिरीश बापट म्हणाले, “सत्याचे प्रयोगऐवजी सत्तेचे प्रयोग सुरु आहेत. सत्तेचे प्रयोग जरा बाजूला ठेऊ. उद्या कोणी ना कोणी सत्तेत येईल. इथे काही कुणी चिरकाल आलेला नाही. खऱे सत्याचे प्रयोग केले पाहिजे जनमानसात गेले पाहिजे ”, असेही ते म्हणाले.

यावेळी गिरीश बापट यांनी भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. आता भेसळ करणाऱ्यांवर आणि गुटखा विकणाऱ्यांवर कडक कारवाई करु. कायद्यात सुधारणा करुन भेसळ आणि गुटखा विक्रीच्या गुन्ह्यांसाठी थेट जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करणार आहे. सध्याच्या कायद्यानुसार असणारी शिक्षा तोकडी आणि बरेच ठिकाणी जामिनपात्र आहे. येत्या कॅबिनेटमध्ये नवी दुरुस्ती मंजूर करुन घेऊ, असेही बापट यांनी यावेळी बोलताना सांगितले.