सगळ्यात आधी उद्धवजींनी गडकिल्ले भाड्याने देण्याचा कागद जाळावा – अमोल कोल्हे

0
377

मुंबई,दि.२८(पीसीबी) – मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह मित्रपक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीचे नेतृत्व एकमताने उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवले. यानंतर राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

गडकिल्ले भाड्याने देण्याचा अगोदरच्या शासनाच्या कागद उद्धव ठाकरेंनी जाळावा, हाच पहिला निर्णय घ्यावा, असं कोल्हे यांनी म्हटलं आहे. शेवटी सरकारने काय निर्णय घ्यावा हे त्यांचं काम आहे. परंतू महाराष्ट्राच्या विकासाचा, शेतकऱ्यांना दिलासा देणारा, तरूणांच्या रोजगारासंबंधीचा निर्णय असावा, असं कोल्हे म्हणाले आहेत.

दुसरीकडे अजित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादीत यावं, अशी अनेक नेत्यांची भावना होती. अजित पवारांचं योगदान सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुटुंबात फूट पडू नये अशी प्रत्येकाची इच्छा होती. ती इच्छा अजितदादांनी पूर्ण केली. अजित दादांसंबंधीचा योग्य तो निर्णय पवारसाहेब घेतील, असंही कोल्हे म्हणाले आहेत.