संभाजी भिडे – चंद्रकांत पाटील यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण

0
341

कोल्हापूर, दि. ६ (पीसीबी) – शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. कोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणात  वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या  भिडे गुरुजींनी अचानक पाटील यांची भेट घेतल्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.