संभाजी भिडे –चंद्रकांत पाटील यांची भेट; तर्कवितर्कांना उधाण

0
676

कोल्हापूर, दि. ६ (पीसीबी) – शिव प्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. कोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणात  वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या  भिडे गुरुजींनी अचानक पाटील यांची भेट घेतल्यामुळे उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.  

भिडे गुरुजी आज (गुरूवारी) पहाटे सव्वा सहा वाजता कोल्हापूरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी चंद्रकांतदादांच्या निवासस्थानी जाऊन सुमारे अर्धा तास चर्चा केली. या भेटीचे नेमके कारणे समोर आलेले  नाही. तर या भेटीनंतर पाटील यांनीही माध्यम प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या भेटीमागील  रहस्य वाढले आहे.

दरम्यान, कोरेगाव-भीमा प्रकरण आणि शेतातील आंबे खाल्ल्याने अपत्य होते, असे वादग्रस्त विधान करून   भिडे गुरुजी यांनी वाद ओढावून घेतला होता.  यापार्श्वभूमीवर पाटील-भिडे यांची भेट झाल्यामुळे  तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे भिडे गुरुजी लक्षतीर्थ वसाहतीत रविवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी कोल्हापूरात आल्याचे सूत्रांकडून  सांगितले जात आहे.