संत निरंकारी मिशनद्वारे पुणे शहरामधील भुकेलेल्यांसाठी मायेचा घास

0
592

पुणे, दि.३० (पीसीबी) – निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन संगमवाडी-येरवडा ब्रांच द्वारा पुणे जिल्ह्यामध्ये येरवडा, पुणे रेल्वे-स्थानक या ठिकाणी गरजू नागरिकांना जेवण वाटप करण्यात आले.
कोरोना चा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे.

कोरोना रोगाच्या महामारीमुळे देशातील सर्व व्यापार-व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हि पार्श्ववभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी ची जाणीव लक्षात ठेवून गरजू नागरिकांना संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा जेवण वाटप करण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन अन्नदात्यांकडून करण्यात येत आहे. स्वयंसेवकांनी स्वतः मास्क,हॅन्डग्लोस चा वापर करून अन्नदान केले. स्वयंसेवक अन्नदान करण्याबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे महान कार्य करीत आहेत.
संत निरंकारी मिशन चे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेवसिंह जी महाराज यांनी संदेश दिला होता की “प्रदूषण आतील असो किंवा बाहेरील दोन्ही हानिकारक आहेत”. २००३ पासून निरंकारी मिशन द्वारे स्वच्छता अभियान,वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. संत निरंकारी मिशन च्या सामाजिक कार्याची दखल घेत भारत सरकारतर्फे मिशन ला स्वच्छेतेसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.