संजय राऊतांनी आज ट्विटरवर पोस्ट केली अटलबिहारी वाजपेयींची कविता.

0
596

मुंबई,दि.२० (पीसीबी)- सत्ता स्थापनेच्या हालचाली वर शिवसेना खासदार संजय राऊत रोज सूचक ट्विट करत असता. कविता शायरी पोस्ट करण्याचा त्यांचा धडाका सुरूच आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा कविता शेअर केली आहे. आज त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट केली आहे.

संजय राऊत यांनी आज आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनो के विघ्नो ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीची हड्डिया गलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे. अपनो के विघ्नों ने घेरा असे म्हणत त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. यासोबतच पुन्हा एकदा दिवा लावणार असेही याचा अर्थ होतो.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे ते सतत सांगत आहेत. यासोबतच ट्विटरच्या माध्यमातून ते अप्रत्यक्षपणे रोज भाजपला टोला लगावत असतात. राज्यात महाराशिवआघाडीचे सरकरा स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.