शिवाजी नाही…”छत्रपती शिवाजी महाराज” अन् टाळ्यांचा कडकडाट

0
518

मुंबई,दि.२०(पीसीबी) – बहुप्रतिक्षित ‘तान्हाजी द अनसंग वाॅरिअर’ चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. प्रदर्शनादरम्यान अभिनेता शरद केळकरला एका महिलेने चित्रपटाविषयी विचारताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी केला. यावेळी शरदने दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

महिलेने महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी करताच शरदने त्या महिलेची चूक दुरुस्त करत छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं. त्याच्या या उत्तराने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत एकच जल्लोष केला.

शाब्बास शरद केळकर, जिंकलस भावा ह्याला म्हणतात महाराजां बद्दल चे प्रेम आणि आदर..

शाब्बास शरद केळकर, जिंकलस भावाह्याला म्हणतात महाराजां बद्दल चे प्रेम आणि आदर..

Gepostet von PCBToday.in am Dienstag, 19. November 2019

शरद केळकरच्या या उत्तराचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत असून चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या शरद केळकरवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.