शुल्लक कारणावरून महिलेला अमानुष मारहाण…

0
505

खेड, दि.१५(पीसीबी) : शेतात म्हैस चारण्याच्या कारणावरून एका महिलेला तिचा पुतण्या आणि त्याच्या पत्नीने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी दीड वाजता बहुळ गावात घडली.

पूजा ज्ञानेश्वर वाडेकर (वय 55, रा. बहुळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्तात्रय बाळासाहेब वाडेकर आणि सोनाली दत्तात्रय वाडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजा त्यांच्या शेतामध्ये काम करत होत्या. त्यावेळी त्यांचा आरोपी पुतण्या दत्तात्रय आणि त्याची पत्नी सोनाली हे दोघेजण आले. त्यांनी शेतात म्हैस चारण्याच्या कारणावरून पूजा यांच्याशी भांडण केले. दत्तात्रय याने लाकडी ओंडक्याने व लोखंडी खुटीने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये पूजा यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पूजा यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत गुन्हा नोंदवला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.