६० हजारांचे मंगळसूत्र चोरटयांनी शिताफीने कसे लांबवले पहा…

0
362

पिंपरी,दि.15(पीसीबी) : झोपताना डोक्याजवळ काढून ठेवलेले 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 14) पहाटे एक वाजताच्या सुमारास मेदनकरवाडी येथे भगतवस्ती येथे घडली.

कलाबाई जगन्नाथ पंचरास (वय 60, रा. भगतवस्ती, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चार इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी कलाबाई आणि त्यांचे पती त्यांच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात झोपले होते. झोपताना कलाबाई यांनी त्यांचे 60 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून डोक्याजवळ ठेवले होते. सोमवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी त्यांचे मंगळसूत्र चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.