शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास उद्धव ठाकरेंचा नकार?

0
401

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्तारावर शुक्रवारी रात्री चर्चा झाली. शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत ही माहिती मिळाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदे यांच्यासाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केले आहे. तसेच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष  आहे.

अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब  करण्यात आले आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादे मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावे आघाडीवर आहेत. तर दादाजी भुसे आणि संजय राठोड यांचीही नावे चर्चेत आहेत.