शिवसेनेच्याच खासदाराने म्हटले घड्याळाला मत द्या; शिवसैनिकाने “त्या” खासदाराची कॉलर पकडली

0
348

उस्मानाबाद, दि. १९ (पीसीबी) – गुरूवारी (दि. १८) ऐन मतदानाच्या वेळी शिवसेनेचे विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसले. गायकवाड यांनी शिवसेनेऐवजी घड्याळाला मत द्या, म्हटल्यामुळे ही बाचाबाची झाली.  उस्मानाबाद येथील भोसले हायस्कूल मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान केंद्राच्या ठिकाणी आलेले शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना एका शिवसैनिकाने मतदान कुणाला करायचे असा प्रश्न केला. यावर गायकवाड यांनी घड्याळाला द्या, असे उत्तर दिल्याने शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून गेले.