शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उदयनराजेंच्या विरोधात साताऱ्यातून उमेदवारी

0
524

मुंबई, दि. २२ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यातून उमेदवारी दिली जाणार आहे. कोल्हापुरात आयोजित युतीच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, नरेंद्र पाटील आज दुपारी मातोश्रीवर येणार आहेत. यावेळी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.  नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

सातारा मतदारसंघातून आधी भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव समोर आले होते. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण इथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे. मराठा मोर्चे निघाला होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ही मतं नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटील रिंगणात उतरणार आहेत.

राज्य सरकारने यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचं अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता.