शिवसेना-भाजप चौकातील कुत्र्यांसारखे भांडत आहेत – धनंजय मुंडे

0
407

ठाणे, दि. १६ (पीसीबी) –  शिवसेना आणि भाजप  हे दोन्ही पक्ष गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि महापालिकांमध्ये एकत्र  संसार  करत आहेत. मात्र,  हे दोघेही चौकातील कुत्र्यांसारखे एकमेकांशी भांडत आहेत, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे नेते व  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजपच्या युतीतील वादावर  केली आहे.