अमली पदार्थविरोधी पथकाचे कार्यालय मासुळकर कॉलनीत; २६ जानेवारीला उद्घाटन

0
445

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अमली पदार्थविरोधीत पथकाचे कार्यालय पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. येत्या २६ जानेवारीला या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

मासुळकर कॉलनी मंडई परिसर हा अतिशय शांत परिसर आहे. येथील भाजी मंडई आणि महापालिकेच खेळाच मैदान हा तळीरामांचा अड्डा झाला होता. यामुळे येथे भांडणे देखील होत होती. काही वर्षापूर्वी येथे खून देखील झाला होता. यामुळे तेथील स्थानिक नागरिक हैरान होते. या परिसरात बऱ्याच वर्षांपासून पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी स्थानिकांची होती. मात्र काही अडचणींमुळे ते शक्य होऊ शकले नाही. मात्र येथील महापालिकेच्या जागेत नव्याने बांधण्यात आलेल्या कार्यालयातून अमली पदार्थविरोधी पथक आपले काम पाहणार आहे. पोलिसांच्या उपस्थितीमुळे तळीरामांना चाप बसेल आणि परिसर शांत राहिल या अपेक्षेने तेथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. सध्या या अमली पदार्थविरोधी पथकाकडे एक पीआय आणि दोन पीएसआय असा एकूण १८ जणांचा स्टाफ आहे.